https://www.mahitikendra.org/
संगणक, स्मार्टफोन (मोबाईल डिव्हाइसेस), प्रिंटर, आणि इंटरनेट यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे संवाद आणि माहिती शिकण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये
इंटरनेटवर माहिती कशी शोधावी, स्त्रोतांचे मूल्यांकन कसे करावे आणि विविध स्वरूपांमध्ये दर्शविल्या जाणाऱ्या माहितीचे मूल्यांकन माहित असणे.
1. डिजिटल सामग्री शोधणे आणि वापरणे 2. डिजिटल सामग्री तयार करणे 3. संवाद साधणे किंवा सामायिक करणे
१. संगणकाचा वापर
2. इंटरनेट
३. सॉफ्टवेअर
४. मोबाईल
५. सोशिल मीडिया
01
संगणक कसे हाताळावे, ऑन, ऑफ, लॉगिन आणि पासवर्ड सेट करता येणे, फाईल / फोल्डर बनवणे, बदल करता येणे, आणि डिलीट करणे. आवश्यक असणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, अँटी-व्हायरस इन्स्टॉल आणि वापर करता येणे.
02
वेब ब्राउझर जसे Chrome किंवा Mozilla Firefox इन्स्टॉल करता येणे, सर्च इंजिन Google योग्य वापर करता येणे. माहिती शोधणे, आवश्यक सामग्री डाउनलोड करणे, वेबसाइट वर फॉर्म भरता येणे, शॉपिंग करणे, इत्यादी. इमॆल (Email) कसे करावे आणि ई-मेल आयडी शेयर करणे
03
मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस: मध्ये वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट (Word, Excel and Powerpoint) यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या सोबतच टायपिंग ची स्पीड असणे महत्वपूर्ण आहे.
04
डिव्हाइसेस हाताळता येणे, मोबाईल लॉक, पासवर्ड सेट करणे, वायफाय (wifi) आणि मोबाईल डेटा कनेक्ट करता येणे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर फक्त प्ले स्टोर (Play Store) मधून अति आवश्यक आणि माहिती असलेलेच अँप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे.
05
सोशल मीडिया चा वापर हल्ली वाढलेला आहे, WahtsApp, Facebook, Twitter, आणि Instagram. आपण काय शेयर करतोय आणि कोणाला, मेसेजेस करणे, फॉलो करणे आणि फोटो, विडिओ शेयर करणे, या बाबत जागरूकता असणे गरजेचे असते. बरेचदा आपण आपल्या निष्काळजी पण मुळे नुकसान होते.
1. OTP शेअर करणे टाळणे हा डिजिटल सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 2. OTP हे एक-वेळचा पासवर्ड आहे जो आपल्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी वापरला जातो. ते कधीही कोणाशीही शेअर करू नये, त्यामुळे तुमच्या खात्यात अनधिकृत प्रवेश होऊ शकतो आणि तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.