जागरूकता Mindfulness) सराव करा

प्रत्येक दिवशी काही मिनंटे घेऊन, एकांत जागा शोधा. आरामदायी स्थितीत बसा आणि डोळे मिटा. तुमचा श्वास नैसर्गिकरित्या जाऊ द्या आणि काहीही न करता येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे निरीक्षण करा.

नकारात्मक विचार ओळखून त्यांना आव्हान द्या:

आपल्याला त्रास देणारे नकारात्मक विचारांचा शोध घ्या. या विचारांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे करा आणि त्यांना अधिक सकारात्मक आणि संतुलित दृष्टिकोनाने पुनर्परिभाषित करा

कृतज्ञता सराव

(Gratitude Practice)

जे चांगले आहे आणि तुम्हाला आवडते अशा जीवनातील गोष्टींची नियमित यादी करण्यासाठी काही मिनिटे घ्या. एक कृतज्ञता डायरी ठेवा त्यामध्ये आपल्या दिवसातील साध्या क्षणांची कदर करा: जसे की मित्राचा हसरा चेहरा किंवा सूर्यास्ताचे सौंदर्य.

योगासने आणि प्राणायाम शरीरातील ताण कमी करण्यास आणि मनाला केंद्रित करण्यास मदत करतात. तुमच्या अनुभव स्थरासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शोधा.

योगासने आणि प्राणायाम

निसर्गाशी जुाडा:

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून तेथील दृश्ये आणि आवाजांद्वारे शांतता मिळवा

जंगलात फिरणे, समुद्रकिनाऱ्यावर वेेळ घालवणे, किंवा अगदी वृक्षाखाली बसणे निसर्गात आपले मन शांत करण्याचे असंख्य मार्ग आहेत.

जीवनशैलीत बदल

पर्याप्त झोप घ्या

झोप म्हणजे तुमचे शरीर आणि मन आराम करण्या आणि रिचार्ज होण्यासाठीचा वेळ आहे

संतुलित आहार घ्या:

पौष्टिक आणि निरोगी आहार तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे.  साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ टाळा, फळे, भाज्या, आणि पूर्ण धान्य यांचेे आहार संतुलित करा.

डिजिटल डिटॉक्स:

फोन, टीव्ही, लॅपटॉप यांपासून वेळोवेळी विश्रांती घ्या. एखादी आवड निवडा, किंवा फक्त निवांत बसा.